March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पिंपळवाडी सरपंचपदी जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड

बार्शी ;

पिंपळवाडी ता. बार्शी ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी माजी आ.दिलीप सोपल प्रणित अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीच्या जयश्री रमेश चौधरी तर उपसरपंचपदी गोवर्धन चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पिंपळवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक अटी तटीची  झाली होती. अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडीचे 7 पैकी 5उमेदवार बहुमताने विजयी झाले.
  पिंपळवाडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी जयश्री  चौधरी यांचा तर उपसरपंच पदासाठी गोवर्धन बाळनाथ चौधरी यांचा प्रत्येकी एकच अर्ज  दाखल झाला होता.
   या वेळी नवनिर्वाचित सदस्य आजमोदीन  मुलाणी,  रेश्मा संदीप चौधरी, पूजा पांडुरंग चौधरी, रोहित अनिल चौधरी हे उपस्थित होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे  आर. कोळी, ग्रामसेवक  के. व्ही  सुरुसे यांनी काम पहिले.  रमेश  चौधरी , राजेंद्र चौधरी ,अंबादास सावकार, अनुबा अण्णा  दत्ता पाटील, गोवर्धन माने, परसराम पाटील,  तात्या  ओव्हाळ ,मधुकर माने, भाऊसाहेब चौधरी  राजकुमार चौधरी, बुबासाहेब डांगे उपस्थित होते. अन्नपूर्णा ग्राम विकास महाआघाडी चे उमेदवार  बहुमताने विजयी झाल्यामुळे ग्रामपंचायत समोर आनंद साजरा करण्यात आला.

Advertisement

Leave a Reply