March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पावसाचा ट्रेन्ड बदलतोय, ऑक्टोबर मध्येही दमदार सुरूच

नाशिक : यंदा ऑक्टोबर महिना ठरतोय दमदार…जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातही परतीच्या पावसाचा जोर कायम असून, आतापर्यंत १४५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विक्रमी पाऊस झाल्याने बळीराजाला मात्र त्रासलाच आहे. बागलाण तालुक्यात २८१ तर येवल्यात २५६ टक्के पाऊस झाला असून, मालेगाव मात्र या परतीच्या पावसाच्या तडाख्यापासून वाचले आहे.

पावसाचा ट्रेंड बदलला…

जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार फटकेबाजी सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचा ट्रेंड बदलत असून, ऑक्टोबरमध्ये देखील पाऊस जोरदार हजेरी लावतो. १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात ९२३.९२ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना १ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत १३३८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply