March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पानगाव ता.बार्शी येथील ग्रामसेवकाची चौकशी करून निलंबन करा; लक्ष्मण नाईकवाडी

बार्शी;

पानगाव ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाची निपक्षपणे विभागीय चौकशी करूण त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे उप तालुका प्रमुख लक्ष्मण  नाईकवाडी यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की ग्रामसेवक हे गावामध्ये राहात नाहीत आठवडयातुन तिन दिवस हजर असतात, ते पण सकाळी११.३० नंतर गावातील शेतकरी व सर्वसामान्य नागरीक शेतात व कामाला गेल्यानंतर ग्रामसेवक
हजर असतात. ही बाब नाईकवाडी यांनी स्वत: अनेक वेळा पुराव्यासह निदर्शनास आणुन दिलेली आहे.तसेच गटविकास
अधिकारी पंचायत समिती,बार्शी व विस्तार अधिकारी यांच्याकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रारी
केल्या आहेत. तरीसुध्दा ग्रामसेवक हजर नसतात.  गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पानगाव ग्रामसेवकास पाठीशी घालतात असा आरोपही निवेदनात केला आहे.
गावातील कामासंदर्भात तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. तरीही ग्रामसेवक काम करत नाहीत. ग्रामपंचायतीला काही कामा संदर्भात माहिती अधिकार दिलेले आहेत. ती माहिती सुध्दा वेळेत दिलेली नाही.  ग्रामपंचायत समोर कामा संदर्भात व माहिती साठी उपोषण
सुध्दा केलेले आहे. तरी ग्रामसेवकला काही फरक पडत नाही व ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात
घोटाळा झालेला आहे. त्याची पण नि:पक्ष चौकशी होवुन ग्रामस्थांना न्याय मिळावा. ग्रामसेवक यांनी इतरही काही कामे अनधिकृतरित्या करुन चुकीची माहिती दिलेली
आहे.  चौकशी व निलंबनाची कार्यवाही करुन जो
भ्रष्टाचार व अपहार झाला आहे त्याची विभागीय चौकशी करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply