March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पानगावच्या ग्रामसेवकाची चौकशी करूण अहवाल सादर करा,उपमुख्य कार्यकारी अधिकारी


बार्शी:
पानगाव ता. बार्शी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बि. व्ही.भोसले यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना तालुका उपप्रमुख लक्ष्मण नाईकवाडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पानगाव च्या ग्रामसेवकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लेखी पत्र काढून याबाबत सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करावा असे पत्र बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना काढले आहे.
  याबाबत अधिक माहिती अशी की पानगाव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक मनमानी कारभार करतात अशी तक्रार शिवसेनेचे तालुका उपप्रमुख पिंटू उर्फ लक्ष्मण नाईकवाडी यांनी 23 फेब्रुवारी रोजी केली होती. ग्रामसेवक भोसले हे आठवड्यातून तीन दिवस हजर असतात. तसेच  पुराव्यानिशी तक्रारी करूनही बार्शीचे गटविकास अधिकारी हे त्यांना पाठीशी घालतात आदी मुद्द्यावरून गायकवाड यांनी तक्रार केली होती. त्यावरून विस्तार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून तसा अहवाल संबंधित तक्रारदार व जिल्हा परिषदेस पाठवून द्यावा असे पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply