March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पाण्यात वाहुण गेलेल्या तरूणाचे प्रेत साडेतीन महिन्यानंतर सापडले

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

दि १५ ऑक्टोबर रोजी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या अजय उर्फ दादा अर्जुन चौधरी वय ४० वर्ष रा राणा कॉलनी,बार्शी या तरुणाचे प्रेत सापडले असल्याची खबर मयताच्या पत्नीने पोलिसांना दिली आहे
अधिक माहिती अशी की,दि १५/१०/२०२० रोजी झालेल्या  अतिवृष्टी पावसामुळे बार्शी ते फपाळवाडी रोडवरील शहरा लगत असलेल्या यशवंत नगर नजीकच्या ओढ्याचे पाणी पुलावरून वाहत होते मयत दादा चौधरी हा बार्शीहून घराकडे म्हणजे राणा कॉलनी येथे जाण्यासाठी पुलाजवळ आला त्यावेळी पुलावरून पाणी वाहत होते त्या पाण्यातून जात असताना तो वाहून गेला होता त्यावेळी पासून नातेवाईक आणि पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र शोध लागला नव्हता आज दि २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता तुळजापूर रोडवरील अशोका हॉटेलचे मालक  योगेश सावळे यांनी फोन करून सांगितले की आमच्या हॉटेलच्या बाजूला श्यामसुंदर मुळे यांच्या शेतालगत ओढ्यातील काटेरी बाभळीच्या झाडात एक मानवी सांगडा दिसत आहे म्हणून फिर्यादी व त्यांच्या नातेवाईक त्या ठिकाणी गेले त्यावेळी पोलीस आणि इतर नागरिक होते  त्यावेळी त्या ठिकाणी जाऊन बघितले असता काटेरी झाडात एक मानवी सांगडा अडकलेल्या अवस्थेत होता तसेच त्याच्या मानेत शर्ट अडकला होता त्या शर्टवरून हा सांगडा दादा चौधरी याचा असल्याचे फिर्यादीने सांगितले याबाबत शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास सपोनि ज्ञानेश्वर उदार करत आहेत
मयताच्या कुटुंबाला आवश्यक ती शासकीय मदत मिळावी यासाठी बार्शीतील सहजीवन संस्था तसेच इतर काही संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले होते

Leave a Reply