October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून धामणगाव येथे एकास मारहाण

बार्शी;

पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून तिघांनी मिळून एकास बेदम मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील धामणगाव (दु) येथे घडला.

#रमेश शिंदे, अजय काळे व रमेश शिंदे याचा मित्र अनोळखी नाव माहीत नाही अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#आदिनाथ रामचंद्र कांबळे वय 35वर्षे ,  रा. धामणगाव दु ता. बार्शी असे जखमीचे नाव आहे.फिर्यादीत म्हटले आहे की ते सेंट्रीगचे काम करुन कुटुंबाची उपजिवीका करतात.ते गावातील धनाजी लुंगशे यांचे सेंट्रीगचे काम करीत असताना वैराग येथील रमेश शिंदे हा त्याचा मामा संजय नागनाथ ढावारे रा धामणागाव यांच्या घरी राहणेस आहे दोन तीन दिवसापुर्वी ते रहात असलेल्या येण्याजाण्याच्या रोडवर घाण करण्याच्या कारणावरुन भांडने झाली होती. मागील भांडनाचा राग मनात धरुन रमेश शिंदे यांने त्याचे मित्र अजय काळे व दुसरा मित्र अनोळखी नाव माहीत नाही यांनी येवुन  तु काल परवा आमचे बरोबर का भांडणे केली. असे म्हणुन रमेश शिंदे याने बांधकामावर पडलेल्या विटाने माझे पाठीवर ,कानावर व डोकीस मारले.अजय काळे याने हाताने व लाथाबुक्याने मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली व रमेश शिंदे याचा मित्र अनोळखी नाव माहीत नाही याने बांधकामावर पडलेला खोऱ्या घेवुन फिर्यादीस उजवे पायावर मारुन मारहाण केली आहे.वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply