October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांढरी तलावासाठी 8 कोटी, 68 लाख, 89 हजार, 130 रूपयांचा निधी मंजूर, आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नांना यश

बार्शी ;

पांढरी ता.बार्शी येथील 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या जुन्या पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह 8 कोटी, 68 लाख, 89 हजार,130 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सदरच्या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून जुन्या पाझर तलावा इतकीच साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे, यांनी नव्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे प्रमाणित केलेले आहे. सदर योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार साठवण क्षमता 675.00 स.घ.मी. असून, नियोजीत सिंचन क्षमता 149 हेक्टर इतकी आहे.

सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्ती साठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.

पांढरी येथील जुन्या पाझर तलावाचे रुपांतर साठवण तलावात करण्यासाठी आ. राजेंद्र राऊत यांनी महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला होता.

Leave a Reply