September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी शिवारात अज्ञात कारणाने 26 एकर उस जळुन 52 लाखांचे नुकसान



बार्शी :-महाराष्ट्र स्पीड न्युज
अज्ञात कारणावरूण सहा शेतक-यांचा तब्बल 26 एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडुण 52 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील पांगरी शिवारात आज दि.7 सोमवारी पहाटे उघडकीस आला. मोठ्या प्रमाणात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे शेतकरी भेदरला असुन आर्थिक नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना मदत द्यावी अशी मागणी शेतकरी प्रशांत झालटे यांनी केली आहे.

Advertisement

#प्रमोद झालटे,प्रशांत झालटे,जयसिंग पाटील,शुभाष निकम, आबासाहेब पाटील,हरिश्चंद्र माने अशी उस जळाल्यामुळे आर्थिक अडचणीत आलेल्या शेतक-यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की प्रमोद व प्रशांत झालटे यांची पांगरी-पाथरी रस्त्यालगत गट नंबर 106,97 मध्ये  ऊस शेती आहे .त्यांच्या शेतात सुरूचा ऊस ड्रिपवर  लावण्यात आला होता.ऊस कारखान्यास नेण्यायोग्य परिपक्व झालेला होता.मात्र काल रात्री अचानक त्यांचा तब्बल 18 एकर क्षेत्रातील ड्रिपसह 36 लाख रूपयांचा ऊस जळुन खाक झाला.तसेच शेजारील पाटील या शेतक-यांचा दोन एकर (चार लाख) ,शुभाष निकम दोन एकर (चार लाख),आबा पाटील दोन एकर (चार लाख) व माने यांचा दोन एकर(चार लाख) असा एकुण 26 एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडुण जळाला.आगीमध्ये ऊसासाठी करण्यात आलेले ड्रिप, पाईप आदी सर्व साहित्यही जळुन खाक झाले.अगोदरच विविध बाजुंनी आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांच्याच मागे पुन्हा संकट येत असल्याचे दिसुन येत आहे.सध्या थंडीचे दिवस असताना ऊस नेमका कशामुळे जळाला याचा शोध घ्यावा अशी मागणी केली जात आहे. याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात घटनेची खबर देण्यात आली आहे. 

# श्रीकांत शेळके(गाव कामगार तलाठी, पांगरी):-
दरम्यान गाव कामगार तलाठी श्रीकांत शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी करून पंचनामा केला.पंचनामा अहवाल वरिष्ठांना पाठवला जाणार आहे.

Leave a Reply