June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी येथे ग्रामस्तरीय नियोजन बैठक संपन्न


बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

पांगरी ता. बार्शी येथे कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर गावात लसीकरण मोहीम राबवण्यासाठी ग्रामस्तरीय समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात
संपन्न झाली यावेळी यावेळी. विलास लांडे, शहाजी धस, धनंजय खवले, रामभाऊ देशमुख, सतीश जाधव यांच्यासह    ग्रामपंचायत सदस्य ,आशा गटप्रवर्तक, आरोग्यसेविका, सेवक, आशा कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
  यावेळी आरोग्य सहाय्यक संजय उपरे यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना बाबत उपस्थितांना माहिती दिली .रुग्ण सध्या वाढत आहेत,मास्क  वापरावा, सुरक्षित अंतर ठेवावे  असा सल्ला यावेळी देण्यात आला.
गावातील किराणा, चिकन विक्री केंद्र त्यांच्यासह 45 ते साठ वर्षा वरील  व्याधी ग्रस्तांची तपासणी केली जाणार आहे तसेच व्याधिग्रस्त ना मोफत लसीकरण केले जाणार आहे लसीकरण करण्यासाठी आशा कार्यकर्ती आरोग्य सेवक सेविका ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा असेही आवाहन यावेळी करण्यात आले प्रस्ताविक ग्रामसेवक संतोष माने यांनी केले.यावेळी एस.एस. डमरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply