पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी शाळेत महामानवाला अभिवादन

पांगरी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
पांगरी ता.बार्शी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आदरांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रारंभी संस्थेच्या उपाध्यक्ष सौ. सुलभा जगताप आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किरण बागडे यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजीव बगाडे यांनी बाबासाहेबांचा कार्याबद्दल माहिती सांगितली.
यावेळी स्थापत्य अभियंता सागर जगताप, अधीक्षक वाहिद शेख, मारुती आडगळे, सौ शारदा साठे, सचिन नन्नवरे, तानाजी चव्हाण ,अनिल काळे, अक्षय चांदणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement