पांगरीतील शिक्षिका पंचफुला गायकवाड राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने पुण्यात सन्मानित

पुणे; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी (मुले) शाळेतील उपक्रमशील शिक्षिका व मूळ गाव पांगरी रहिवासी श्रीमती. पंचफुला गायकवाड (बगाडे) मॅडम यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२० चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार स्टेशन रोड पुणे येथील सांस्कृतिक भवनात समारंभपूर्वक मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह रविवारी प्रदान करण्यात आला. शिक्षण हा राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. त्यामुळे समर्पित वृत्तीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. श्रीमती. पंचफुला गायकवाड (बगाडे) यांनी २९ वर्षाच्या सेवेत विवीध ठिकाणी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले विषेश प्रयत्न व विवीध प्रकारचे सहशालेय उपक्रम, विवीध स्पर्धा परीक्षा तयारी राबविण्यात आले बद्दल त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. या प्रसंगी शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, जेष्ठ विचारवंत श्रावण देवरे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव सत्यजित जानराव, संघटक नईम इनामदार, केंद्र प्रमुख श्रीहरि गायकवाड, ईन्नुस पटेल सरपंच केंद्रिय मुख्याध्यापिका शैला कुलकर्णी, सुरेखा हंगे, अनुसया माचेवाड, हिराबाई क्षीरसागर, बाबासाहेब शिंदे, गणेश गोडसे, संजय बोकेफोडे,आबासाहेब घावटे,बालाजी मुळे अतुल खाडे, प्रताप चौधरी, उमेश गाढवे, मनोज गादेकर, दिपक काळे, परमेश्वर कोल्हे, धनंजय बगाडे, सुभाष पवार, प्रगती बगाडे, प्रतीक बगाडे, केतन बगाडे, किशोरकुमार बगाडे यांचे सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.