March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी पोलीस ठाण्यात ज्येष्ठांना कोरोणाविषयक मार्गदर्शन

बार्शी ;

सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या सूचनेनुसार पांगरी ता.बार्शी येथील पोलीस ठाण्यात ज्येष्ठ नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्या बैठकीत  पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील जेष्ठ नागरीक यांची कोरोना या विषाणूचा संसर्ग व वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता काळजी घेण्याबाबत तसेच कोरोना लस घेण्याबाबत सपोनी सुधीर तोरडमल यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या वैयक्तिक अडचणी बद्दल चर्चा करून जेष्ठ नागरीक बद्दल असलेल्या कायद्याची माहिती दिली आहे. तसेच दैनंदिन जीवनात समाजामध्ये वावरताना व आर्थिक तसेच इतर व्यवहार करताना काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.
  तसेच त्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला असुन त्यावर ज्येष्ठ नागरिक त्यांच्या अडचणी व इतर बाबीं संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.या वेळी पांगरी पोलिस ठाणे हद्दीतील  मोठ्या संख्येने जेष्ठ नागरीक उपस्थित होते

Leave a Reply