June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी पोलिसांच्या तत्परतेने दोन मूकबधिर मुली नातेवाईकांकडेबार्शी ;-महाराष्ट्र स्पीड न्युज
रस्ता भटकटुन दुसरीकडे भरकटलेल्या दोन मूकबधिर मुलींना पोलिस पाटील व पांगरी पोलिसांच्या सतर्कतेने त्यांच्या आजोबांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की काल दिनांक 03/12/2020 रोजी रात्री 08:00 वा.चे सुमारास बार्शी तालुक्यातील वालवड येथे दोन अनोळखी लहान मुली वालवडमधील ग्रामस्थांना गावात फिरत असताना दिसून आल्या. त्यांच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता  असता त्या मूकबधिर असल्यामुळे  त्यांना काही बोलता येत नव्हते.वालवड गावातील ग्रामसुरक्षा दल व वालवड गावच्या पोलीस पाटील सौ.मृणालिनी भालेराव,सुहास भालेराव यांनी त्या दोन मुलींना घेऊन पांगरी पोलिस स्टेशन गाठले. पांगरी पोलिस स्टेशन येथे पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून काही एक माहिती मिळाली नाही.त्यानंतर पोलीसांनी त्या दोन मुलींचे फोटो व त्यांच्या बाबत इतर माहिती पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील व इतर सर्व ग्रुप वर पाठवण्यात आली.
  त्यानंतर पाथरी ता. बार्शी येथील पोलीस पाटील शंकर  गायकवाड यांनी फोटो पाहुण प्रतिसाद दिला व त्या मुली  पाथरी येथे मागील चार वर्षा पासून वास्तव्यास असलेले दगडफोड कामगार माणिक साहेबा शिंदे रा. नाथापूर ता. जि. बीड यांच्या नाती असल्याचे सांगितले.त्यांना तात्काळ पोलीस ठाण्यात बोलावून माणिक  शिंदे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, त्या मुली दिनांक 3/12/2020 रोजी पासून दुपारी 02 वाजल्यापासून घरी दिसत नव्हत्या.त्यामुळे आम्ही त्यांचा इतरत्र तपास घेतला परंतु त्या मिळून आल्या नाहीत.त्यांची नावे मालन सुरेश शिंदे वय 12 वर्षे व संगीता सुरेश शिंदे वय 10 वर्ष अशी आहेत. त्यांना बोलता येत नसून त्यांना मराठी भाषा समजत नाही असे सांगितले.त्या दोन मूकबधिर मुलीं या  माणिक साहेबा शिंदे यांच्या नाती असल्याचे खात्री झाल्यानंतर त्यांना त्यांचे ताब्यात देण्यात आले.
          सदर कारवाई मध्ये पांगरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांचे मार्गदर्शनाखाली पो.काॅ अर्जुन कापसे,फिरोज तडवी,सुनिल बोदमवाड,बबिता उर्वते, वालवड गावच्या पोलीस पाटील सौ.मृणालिनी  भालेराव व सुहास  भालेराव, ग्रामसुरक्षा दल वालवड,शंकर  गायकवाड यांच्या सहकार्याने व कार्य तत्परतेने त्या दोन मुलींना 24 तासाच्या आत त्यांच्या कुटुंबियांना पर्यंत  पोहोचविण्यात आले.

Advertisement

Leave a Reply