June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरी ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटरचा शुभारंभ

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

ऑक्सिजन व बेड उपलब्ध न झाल्यामुळे अणेकांना आपला जिव गमवावा लागला असुन पांगरी ता.बार्शी येथे शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमुळे या भागातील सर्व सामान्य रूग्नांची सोय होऊ शकते.कोरोणाची रूग्ण संख्या घटत असली तरी अजुन कोरोणा संपलेला नसल्याने शासनाच्या निकषांनुसार काळजी घ्या असे प्रतिपादन पांगरी पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल यांनी केले.ते पांगरी ग्रामीण रूग्णालयात नव्याने सुरू झालेल्या कोवीड सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
अध्यक्षस्थानी सुहास देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प.सदस्या रेखा राऊत,प्रा.विशाल गरड,सरपंच ईन्नुस बागवान उपस्थित होते.
कोरोना बाधित गरोदर मातांसाठी 10 ऑक्सिजन बेड व इतर कोविड रुग्णांसाठी 10 ऑक्सिजन बेड या सेंटरमध्ये असणार आहेत.
ऑक्सिजन बेड रुग्णांसाठी अमृत असून,रुग्णांसाठी याचा मोठा फायदा होईल.असे मत प्रा.विशाल गरड यांनी मांडले.ग्रामीण रुग्णालयातील सुविधेसाठी वेळोवेळी प्रयत्न करेन असे प्रतिपादन जि .प.सदस्या रेखा राऊत यांनी केले.

यावेळी ग्राहक समिती तालुकाध्यक्ष विष्णू पवार, जेष्ठ पत्रकार तात्या बोधे, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.रवींद्र माळी,डॉ.आरिफ शेख, विजय गरड,इरशाद शेख, चंद्रकांत गोडसे, जिवा देशमुख, ग्राहक समिती प.महा.अध्यक्ष दशरथ उकिरडे,  पत्रकार गणेश गोडसे, बाबा शिंदे, सतीश जाधव,कमलाकर पाटील,विलास जाधव,किरण मुळे,हणुमंत हिप्परकर  आदीं  उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार इरशाद शेख यांनी तर आभार डॉ.रवींद्र माळी यांनी मानले.

Leave a Reply