October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीत विविध विकास कामांचा शुभारंभ

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

पांगरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सौ.रेखाताई राऊत यांच्या प्रयत्नातून व माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त झालेल्या निधीतुन पांगरी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.जि.प.सदस्या रेखाताई राऊत, अरूण नारकर, वित्त अधिकारी डाॅ. वैभव राऊत,सचिन वासकर,सुरज गायकवाड, बाबा गायकवाड, अमोल जानराव,विष्णु जानराव आदी यावेळी उपस्थित होते.
  सौ.राऊत यांनी पाठपुरावा करूण जि.प.कडुण पांगरीतील पशु वैद्यकीय दवाखान्यास संरक्षक भिंत, दलित वस्ती सुधार योजनेतून आण्णाभाऊ साठे नगर येथे पेव्हींग ब्लाॅक, देशपांडे प्लाॅटमध्ये गटार बांधणे,हायमास्ट दिवे, गावातील मुलांना वाचनासाठी इमारत,अंगणवाडी इमारत,स्मशानभूमी शेड आदी विकास कामे मंजुर करूण घेतली होती.त्यापैकी कांही कामाचे उद्घाटन करण्यात आले.तसेच अणेक कामे प्रगतीपथावर आहेत.उद्घाटनानंतर दलित वस्तीतील जनतेच्या अडी अडचणी जाणुन घेतल्या.यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply