October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीत महिलांसाठी हळदी-कुंकू,पैठणी लकी ड्रॉ कार्यक्रम उत्साहात

सोलापूर: महाराष्ट्र स्पीड न्युज

श्रीराम पेठ पांगरी येथे पौष महिन्यातील शेवटच्या रविवारचे औचित्य साधत श्रीराम मंदिरात नूतन ग्रामपंचायत सदस्या सुरेखा विलास लाडे यांनी गावातील सर्व महिलांसाठी हळदी- कुंकू,तिळगुळ तसेच अकरा पैठणी साड्यांचा लकी ड्रॉ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सविता अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बार्शीच्या माजी नगरसेविका विजयश्री पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती कौशल्या माळी, मुख्याध्यापिका किरण बगाडे, उमेद अभियानच्या पंचशीला कसबे,प्रा शारदा येडे पाटील आदी मान्यवरांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमात महिलांनी उखाणे , गाण्याच्या भेंड्या, फेर धरणे, फुगडी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजयश्री पाटील यांनी महिलांना आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सत्यभामा माळी, दीपाली घोडके,सारिका निंबाळकर, रेखा जगताप, तुळसा पौळ, पिंकी बगाडे,नीता सुरवसे,जयश्री कांबळे, मेघा मोरे,कोमल मुळे,शमा शेख या विजेत्यां  पैठणीच्या मानकरी ठरल्या. सूत्रसंचालन कु. आकांक्षा देशपांडे हिने तर आभार प्रदर्शन कौशल्या माळी यांनी केले.

Leave a Reply