पांगरीत मटका घेणा-यास पकडले

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी शहरातून पांगरी येथे जाऊन मटका घेणा-या एकास पांगरी पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
#गणेश सुभाष सुपेकर वय. 27 वर्षे रा सुभाष नगर बार्शी असे याप्रकरणी कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे.
#पो.काॅ. सुरेश बिरकले यांनी फिर्याद दिली आहे. सपोनि सुधीर तोरडमल यांच्या आदेशाने हवालदार मनोज जाधव,वाघमारे हे अवैध धंदयावर कार्यवाही करत पांगरी गावात असताना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,एक इसम पांगरी ता बार्शी गावातील एस टी बस थांबाजवऴ चोरून कल्याण नावाचा मटका घेत आहे. एस टी बस थांबाजवऴ एक पुरूष इसम खाली मानघालुन कागदावर काहीतरी आकडेमोड करित असताना दिसुन आला त्यांचा जुगार गुन्हयाचे कामी संशय आल्याने त्यास गराडा घालुन जागीच पकडले. त्यांच्या जवळून मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. पांगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.