पांगरीत कोरोणा मुक्त गाव अभियान शुभारंभ

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या
माझे गाव-कोरोनामुक्त गाव या अभिमानाचा पांगरी ता.बार्शी ग्रामपंचायतीच्या वतीने शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बार्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर सावंत,पांगरी पोलिस ठाण्याचे सपोनी सुधीर तोरडमल,जि.प सदस्या रेखा राऊत,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश खेंदाड,डॉ. निशिगंध जाधव,महिला बालकल्याणचे शैलेश सदाफुले,पांगरी ग्रामपंचायतीचे प्रशासक श्रीहरी गायकवाड,ग्रामविकास अधिकारी संतोष माने आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना गाव कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी कोणत्या उपाय योजना राबवण्यात येणे आवश्यक आहे व त्याची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गाव कोरोणा मुक्त ठेवण्यासाठी शपथ देण्यात आली.