पांगरीच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाच्या सौ.सुरेखा विलास लाडे तर उपसरपंचपदी धनंजय खवले बिनविरोध

बार्शी;
बार्शी तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाच्या सुरेखा विलास लाडे तर उपसरपंचपदी राऊत गटाचेच धनंजय खवले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन खांडेकर यांनी व अध्यासी अधिकारी बि. व्ही. भोसले यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.
निवडीप्रसंगी नुतन सरपंच लाडे सुरेखा,उपसरपंच खवले धनंजय,ग्रामपंचायत सदस्य गोडसे गणेश , बगाडे भास्कर , जाधव सतीश , धस मिनिषा ,
नारायणकर प्रमिला , काकडे हिराबाई ,
मोरे रेणुका,माळी शैलजा,
बगाडे मैनाबाई,गाढवे सुवर्णा,कुंभार शुभांगी,देशमुख रामभाऊ , बागवान रियाज उपस्थित होते.
निवडीनंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.कार्यकर्त्यांनी निवडीनंतर फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अॅड.अनिल पाटील, संजय बगाडे,विलास जगदाळे,सुहास देशमुख, जयंत पाटील,शहाजी धस,रामा लाडे,गाढवे महाराज,महादेव माळी,विलास लाडे,अंकुश लाडे,
संजय गाढवे,हणुमंत लाडे आदी मान्यवर उपस्थित होते.