October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीच्या राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत भारतीय संविधान दिन साजरा

पांगरी;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

पांगरी ता.बार्शी येथील  राजीव गांधी केंद्रीय निवासी प्राथमिक व माध्यमिक (अ. जाती) आश्रम शाळेत
भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांकडून संविधानाचे वाचन करण्यात आले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. बगाडे यांच्या हस्ते करण्यात आले.  उपमुख्याध्यापक  रामकृष्ण मुळे यांनी सविंधानाविषयी माहिती सांगितली.
यावेळी अधीक्षक वाहिद शेख, पर्यवेक्षिका सौ. शैलजा राऊत, शिक्षकवृंद शिवाजी बगाडे, वसीम मुलाणी, संजय सोनवणे, अक्षय मुंढे, शैलेश पाचभाई, मनोराजा भातलवंडे  तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी शिवा धारूरकर, गणेश गोडसे , राम सुतार , अनिल काळे , अक्षय चांदणे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply