October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पांगरीचे सुहास देशमुख भाजपा बार्शी तालुका उपाध्यक्षपदी तर डाॅ. विलास लाडे तालुका सरचिटणीस पदी


बार्शी ;- महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

भारतीय जनता पक्षाच्या तालुकास्तरावरील पदाधिकारी निवडीत पांगरी ता.बार्शी येथील दोघांना वेगवेगळ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. बार्शी तालुका उपाध्यक्षपदी पांगरी येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख यांना तर तालुका सरचिटणीस पदी डाॅ. विलास लाडे यांची निवड करण्यात आली आहे.
  भाजपा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख,आ.राजेंद्र राऊत, भाजपा तालुका अध्यक्ष मदन दराडे यांच्या हस्ते देशमुख व लाडे यांना अधिकृत नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती अनिल डिसले, भाजपा शहराध्यक्ष महाविर कदम, विजय राऊत,अजित बारंगुळे,  संतोष निंबाळकर, बाबा काटे,प्रमोद वाघमोडे,काका काटे, अविनाश मांजरे आदी उपस्थित होते.निवडीबद्दल अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply