February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पवारांवरील शस्त्रक्रिया यशस्वी;पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात यश,

मुंबई:

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पोटात दुखु लागल्याने त्यांना ब्रिज कॅंडी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.काल उशिरा रात्री पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला.एन्डोस्कोपीद्वारे ही शस्त्रक्रिया पार पडली.यानंतर आणखी काही दिवसांनी एक शस्त्रक्रिया करणार असल्याचे डॉ.मायदेव यांनी सांगितले.या शस्त्रक्रियेमुळे शरद पवारांना पोटदुखीपासून आराम मिळणार आहे. मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार आहे. यासंदर्भात देखील डॉक्टर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, अशी माहिती शरद पवारांवर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली आहे.
आजारपणातही त्यांची रूटीन पूर्वीप्रमाणे
शस्त्रक्रिया झाल्यानंतरही शरद पवार सकाळी रोजच्या प्रमाणे पेपर वाचताना दिसले.यावर सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पेजवर पोस्ट करून ब्रीच कँडी रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स,परिचारीका आणि सपोर्टिंग स्टाफ यांचे मनापासून आभार मानले.ही आजची प्रसन्न सकाळ आहे आणि आदरणीय शरद पवार त्यांचं रोजचं सर्वात आवडतं काम अर्थात वर्तमानपत्रांचं वाचन, करीत असल्याचे सांगितले.
#महाराष्ट्रस्पीडन्युज #Maharashtraspeednews

Leave a Reply