September 27, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पर्यावरणाची जोपासना स्वतः दैनंदिन कृतीतून करावी — मधुकर डोईफोडे

सोलापूर:-महाराष्ट्र स्पीड न्युज

शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शी येथे 19 नोव्हेंबर पासून कौमी एकता सप्ताह साजरा होत आहे त्या अंतर्गत पर्यावरण जोपासना विषयी प्रमुख वक्ते म्हणून बी एड प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन मार्गदर्शन रोटरी क्लब बार्शी चे अध्यक्ष मधुकर डोईफोडे यांनी स्वतः दैनंदिन कृतीतून पर्यावरण जोपासना करण्याचे महत्व सांगितले.
  प्रारंभी प्राचार्य डॉ.सुग्रीव  गोरे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले  प्रमुख वक्त्यांचा परिचय विभाग प्रमुख डॉ भिलेगावकर यांनी करून दिला डोईफोडे सरांनी 10 मूलमंत्र स्पष्ट केले घरात ओला कचरा सुका कचरा तसेच अनावश्यक वस्तू या पासून पुनर्वापर तत्व सांगितले सामाजिक स्तरावर कार्य करूनही प्रत्येकाला पर्यावरण जोपासना करता येते हे त्यांनी स्वतः केलेल्या सामाजिक सेवा कृतीतून सांगितले तीव्र आंतरिक इच्छा  काम करण्याची आत्मीयता आधी केले मग सांगितले अशा काही महत्वाच्या नोंदी विद्यार्थ्यांनी लक्षात घेण्याचेही सुचवले सर स्वतः शिक्षणशास्त्र महाविद्यालाययाचे विद्यार्थी असल्याने व्यक्तिमत्व विकास घडविणारे महाविद्यालय असे कौतुकही सरांनी केले समाजसेवा मुले व्यक्तिमत्व विकास होतो अन्न दान रक्तदान धन दान याबरोबर श्रमदानाला महत्व द्यावे असे सांगत अनेक पौराणिक अर्वाचीन दाखले देत सर नी तंत्रज्ञान युगात आपण नवीन माहिती मिळून कार्यरत रहावे असाही संदेश दिला।डॉ मामासाहेब जगदाळे यांची त्याकाळी संस्था उभारणे ही  एक समाजसेवा  केवळअलौकिक नसून समाजसेवा करताना अनंत अडचणी येतात मामाचे कार्य आदर्श असून ते अंगीकारून आदर्श शिक्षक व्हा पर्यावरण जोपासा।असे स्पष्ट केले विद्यार्थांनी ऑनलाईन आंतरक्रिया करून शंका विचारल्या कार्यक्रमाचा समारोप समन्वयक डॉ भिलेगावकर यांनी आभार प्रदर्शन ने केला बी एड प्रशिक्षणार्थी कु झाडे, श्रीमती जाधव ,कु नारखाडे, कु अपेक्षा चव्हाण ,कु वर्षा मेंडगुळे,यांनी अनुक्रमे पश्चिम बंगाल आंध्रप्रदेश महाराष्ट्र पंजाब गुजरात राज्यातील सांस्कृतिक ओळख करून दिली या सांस्कृतिक विवधतेतून एकता कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु प्रणिता गायकवाड यांनी केले.।प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी आपल्या मनोगतात एकतेसाठी सांस्कृतिक बाबी महत्वाच्या आहेत असे स्पष्ट केले आभार डॉ भिलेगावकर यांनी मानले

Advertisement

राष्ट्र उभारणीत महिलांचे योगदान महत्वाचे आहे –  अंजली श्रीवास्तव

शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शीच्या कौमी एकता सप्ताहात भारतीय समाजात महिलांचे महत्व व राष्ट्रउभारणीत योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना जेष्ठ साहित्यिक अंजली श्रीवास्तव यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रारंभी डॉ भिलेगावकर यांनी श्रीवास्तव मॅडम चा परिचय करून दिला प्राचार्य डॉ गोरे सर यांनी प्रास्ताविक केले  मॅडमनी प्राचीन काळापासून महिलांचे कार्य स्पष्ट केले राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, रमाई याबरोबर अनेक स्वातंत्र्य सैनिक महिलांच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला प्रत्येक स्त्री घर समाज राष्ट्र घडणीसाठी कशी कार्य करते आणि या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या आधुनिक प्रत्येक क्षेत्रात मुलींनी धडाडीने कार्य करण्याचा मूलमंत्र श्रीवास्तव मॅडमनी दिला लता मंगेशकर प्रतिभाताई पाटील  यांनी स्वतःच्या अंगभूत कौशल्याचा समाजसेवेसाठी कसे योगदान दिले हे स्पष्ट केले इंदिरा संत शांता शेळके बहिणाबाई व इतर साहित्यिक महिलांचेही योगदान त्यांनी विशद केले कार्यक्रमाचा शेवट डॉ भिलेगावकर यांनी आभार प्रदर्शन मानून केला डॉ पाटील परमेश्वर यांनी विद्यार्थ्यांसाठी on line  quiz उपलब्ध करून दिली पर्यावरण जोपासना  व जाणीव या विषयावर विद्यार्थ्यांना Quiz दिली कार्यक्रमास सर्व विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply