पदोन्नती बाबत बार्शीत राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे निवेदन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
पदोन्नती मधील आरक्षण संपवण्याचा महाराष्ट्र शासनाने पारित केलेल्या आदेशाला विरोध करण्यासाठी आणि पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे तसे ठेवण्यासाठी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघा मार्फत आज बार्शी तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे आप्पासाहेब देवकर,तानाजी बोकेफोडे,बालाजी आंधारे, बबीता सर्वगोड ,प्रा सुरेश राऊत, दिपक सरवदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले
संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून सोलापूर बार्शी तहसीलदार कार्यालय येथे निवेदन देण्यात आले व काळी फेत लावुन या जी आर चा निषेध करण्यात आला .