October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे सहकार्य करतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार!

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

येत्या काळात होणाऱ्या पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीत जो उमेदवार पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचे प्रश्न प्राधान्याने आगामी काळात  सोडवण्यासाठी प्रयत्न करतील आणि तसा शब्द देतील त्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा ठराव बार्शी शहर व तालुका संघटनेच्या बैठकीत संमत करण्यात आला.
गेली वीस वर्षे पदवीधर पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहे.अंशकालीन पदवीधरांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होत असून आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे, इतर ठिकाणी रोजगार मिळत नाही  वाढलेल्या वयामुळे व्यवसायासाठी बँकासुद्धा कर्ज उपलब्ध करून देत नाहीत. मुलाबाळांचे शिक्षण आई वडील यांचे पालनपोषण योग्य रित्या करू शकत नाही.नोकरीसाठी शासनाकडे पाठपुरावा करून देखील अजून याबाबत ठोस उपाययोजना झाली नाही. वेळोवेळी शासन आमच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे.
अश्यातच वित्त विभागाने 30 सप्टेंबर रोजी बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना यामध्ये अंशकालीन कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात यावे असे अधोरेखित केले आहे परंतु याचे पालन केले जात नाही यात भर म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेतील डेटा एन्ट्री ऑपरेटर या कंत्राटी पदाच्या पदभरतीमध्ये सुधारणा करण्यासाठी चे 29 ऑक्टोबर 2020 चे परिपत्रका मध्ये अंशकालीन कर्मचारी पात्रतेत बसत असताना आमचा या मध्ये कोठेही उल्लेख नाही. या परिपत्रकाचे आमचा उल्लेख होवून तत्काळ शुद्धीपत्रक निघावे या व इतर अनेक विषयावर चर्चा करून वरील ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी सुनील वायचळ,कय्युम पटेल, बाबासाहेब खडतरे,जगन्नाथ जाधव, विजय पाचपुते, नूर शेख, किरण जानराव, भीमराव गुंड, संजय निकम, सचिन परबत, अविनाश चिंचोळीकर उपस्थित होते.
हि प्राथमिक बैठक होती लवकरच मोठा मेळावा घेऊन पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या वतीने उमेदवारांना मागणी निवेदन देण्यात येणार आहे असे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply