February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पत्रकार निसार अलींना  मारहान करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यावर कारवाई करा,

एजेएफसी पत्रकार संघटना

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

               गर्दी का जमवताय अशी विचारणा करणाऱ्या मुंबईतील पत्रकारावर काँग्रेसआय कार्यकर्त्या कडून झालेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करून हल्लेखोरावर तातडीने कडक कारवाई केली जावी अशी मागणी ऑल जर्नालिस्ट अॅड फ्रेंड सर्कल या पत्रकार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
               काँग्रेस नगरसेविका सलमा आलमेलकर यांच्या सेल्फी पाँईटचे उद्‌घाटनाचे वेळी मोठी गर्दी जमली होती . मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे गाडीतून खाली उतरुन गर्दीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करत होते . सेल्फी पाँईट उद्घाटनाच्यावेळी जमलेल्या मोठ्या गर्दीकडे निर्देश करून विचारणा केली म्हणून नगरसेविकेच्या पतिच्या इशाऱ्या वरून काँग्रेस कार्यकर्यांनी  दै . सकाळचे पत्रकार तथा ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेड सर्कल या पत्रकार संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष निसार अली यांना बेदम मारहान करून जखमी केले गेले , हा प्रकार मालवणी गेट क्र . ७  येथे घडला . याबाबतची तक्रार देवून दोन दिवस झाले तरी अद्याप कोणावरही कारवाई केली गेली नाही . या भ्याड हल्ल्याचा ऑल जर्नालिस्ट अॅन्ड फ्रेंड सर्कलचे केंद्रीय अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रिय सचिव हाजी अब्दुलभाई शेख, प्रदेशाध्यक्ष दीपक नागरे , प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी शब्दात तीव्र शब्दात निषेध केला आहे .
               निसार अलीच्या वर हल्ला करणाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अन्यथा या अन्यायाच्या विरोधात राज्यभर मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला असून संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री महोदयांना भेटणार असल्याचे केद्रीय सचिव हाजी अब्दुलभाई शेख यांनी सांगितले .

Advertisement

Leave a Reply