June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पत्रकार धिरज शेळके व बेलगावच्या युवकांनी जपली माणुसकी, वाचविले अनोळखी वृद्ध महिलेचे प्राण

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुक्यातील बेलगाव येथे गत दोन दिवसांपासून भुकेने व्याकुळ होऊन शरीर पकृती खालावलेल्या अनोळखी आज्जीला दवाखान्यात उपचारासाठी दखल करून बेलगाव येथील पत्रकार धिरज शेळके व त्यांच्या सहका-यांनी खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन समाजाला दिले आहे.      
गेल्या दोन दिवसापासून बेलगाव परिसरामध्ये एक आज्जीबाई एकाच ठिकाणी झोपून असून त्यांची पृकृती अतिशय खालावली असल्याची घटना गावातील युवकांनी  शेळके यांना फोनद्वारे कळवताच शेळके यांनी त्या आज्जीला बार्शीला घेऊन येण्याचे सांगितले.
नुतन पोलीस उपनिरीक्षक बापूसाहेब शेळके यांनी युवकांना आधार आणि प्रेरणा देत बार्शीला घेऊन जाण्याचे सांगताच, बार्शी येथील चांडक इंडस्ट्रीज मध्ये कामाला असणारे गावातील तरुण नुकतेच कामावरून घरी आलेले असताना त्यांनी रोहिदास भालेराव यांच्या ओमिनी व्हॅन मधून अमित जगदाळे, बाळासाहेब कांबळे, दादासाहेब शेळके, ज्ञानेश्वर जगदाळे, अक्षय पवार यांनी रात्री 11:30 वाजता बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनला घेऊन आले.
उपचारासाठी  रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी वर्दीतली माणुसकी दाखवत, ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्याचे आदेश आपल्या पोलीस सहकार्यांना दिले. बार्शी ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणे अंमलदार प्रदीप केसरे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोन्दर, होमगार्ड शिवाजी कर्नावळ, शिवाजी शिंदे, सुशील बंगाळे यांच्या सहकार्याने त्या महिलेस त्वरित बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रात्री 12:15 ला दाखल करण्यात आले. यावेळी ग्रामीण रुग्णालयातील डॉ. शितोळे यांना सदरील घटनेची माहिती देताच त्यांनी तपासणी करून त्वरित उपचार चालू केले. रात्री 1 वाजेच्या सुमारास उपचारादम्यान सदरील आज्जींची पृकृती व्यवस्थित असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आल्यावर  सर्वांचे चेहऱे आनंदले.
     एका वृद्ध महिलेचा जीव वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतं होते. या दरम्यान धिरज शेळके यांनी गौडगाव येथील निवारा अनाथाश्रमाचे संचालक राहुल भड यांना ही माहिती सांगताच, त्यांनी देखील आपल्या अनाथालयामध्ये या महिलेस सांभाळण्याचे आश्वासन दिले आहे.

Advertisement

Leave a Reply