June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पत्नीच्या संशयानुसार सचिन वाझे नेच मनसुख हिरेनला मारले ; फडणवीस सभागृहात झाले आक्रमक

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ जिलेटीन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. शुक्रवारी या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेती बंदराजवळ सापडला आणि या प्रकरणाला गंभीर वळण लागले. मनसुख हिरेन बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात असून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता, या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचे आज विधानसभेत पुन्हा एकदा पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हिरेन यांच्या पत्नी विमला यांचा तक्रार अर्जच वाचून दाखवला. विमला हिरेन यांच्या संशयानुसार हिरेन यांची हत्या एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी केली आहे. त्यामुळे वाझेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा विधानसभेत मनसुख हिरेन प्रकरणावरून राज्य सरकारला धारेवर धरले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांचा जबाब वाचून दाखवला. माझ्या पतीची चौकशी वाझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. तसेच हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती, असं हिरेन यांच्या पत्नीने म्हटलं आहे. त्यामुळे वाझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वाझे यांना कोण वाचवतंय? असा सवाल करतानाच हिरेन यांची हत्या गाडीतच करण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

Leave a Reply