June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पंतप्रधान जन औषध केंद्र उघडणा-यांना मोदी सरकार देतेय सात लाख रूपये..वाचा अर्ज कसा करायचा…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 

Advertisement
7 मार्च रोजी पीएम मोदी यांनी जन औषधी दिनानिमित्त 7500 व्या जन औषधी केंद्राला देशाला समर्पित केले. पीएम मोदी यांनी जन औषधी केंद्राची संख्या एका वर्षात 10,000 पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या निमित्ताने पीएम मोदी या योजनेच्या लाभार्थ्यांशी बोलले. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार लोकांना स्वस्त दरात औषधे पुरवित आहे. मोदी सरकार लोकांना या माध्यमातून देशाच्या अनेक भागात पंतप्रधान जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. जाणून घेऊया या योजनेसंर्दभात…

आता 7 लाख रुपयांपर्यंत मिळणार प्रोत्साहन रक्कम
मोदी सरकार नवीन जन जन औषधी केंद्र उघडणाऱ्याला 5 लाख रुपयांपर्यंत प्रोत्साहन रक्कम देत आहे.

परंतु हे केंद्र आकांक्षी जिल्ह्यात उघडल्यास आणखी दोन लाख रुपये उपलब्ध होतील. या प्रकरणात प्रोत्साहन रक्कम 7 लाख रुपये असेल. एखादी महिला अपंग, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीसाठी जनऔषधि केंद्र उघडत असेल तर मोदी सरकार 7 लाख रुपये प्रोत्साहन रक्कम देईल. आधी ही प्रोत्साहन रक्कम केवळ अडीच लाख रुपये होती.

औषध विक्रीवर 20 टक्के कमिशन
आता मोदी सरकार या योजनेंतर्गत जन औषधी केंद्राचे फर्निचर व इतर आवश्यक सुविधा तयार करण्यासाठी प्रति केंद्राला दीड लाख रुपये मदत करीत आहे. तसेच संगणक आणि प्रिंटरसह बिलिंग सिस्टम विकसित करण्यासाठी केंद्र सरकार प्रत्येक जन औषधी केंद्राला 5000 रुपये देत आहे. जन औषधी केंद्रावर औषधांच्या विक्रीवर 20 टक्क्यांपर्यंत कमिशन मिळते. या व्यतिरिक्त, प्रत्येक महिन्याच्या विक्रीवर 15% प्रोत्साहन स्वतंत्रपणे दिले जाते.

सन 2015 मध्ये सुरू झाला होता प्रधानमंत्री जन औषधी प्रकल्प
दरम्यान, 2015 मध्ये मोदी सरकारने पंतप्रधान जन औषधी प्रकल्प सुरू केला होता. सामान्य माणसावरील औषधी खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली होती. जन औषधी केंद्रावर देशातील इतर केमिस्ट शॉप्सपेक्षा 90 टक्के स्वस्त दराने औषध उपलब्ध आहेत, कारण ती सर्वसामान्य औषधे आहेत.

जनऔषधी दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकारच्या या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून देशात रोजगाराचे नवीन मार्गही उघडले गेले आहेत. पंतप्रधान मोदींनी हेही सांगितले की या योजनेमुळे देशातील सर्वसामान्यांना 3,600 कोटी रुपयांची बचत झाली आहे.

हे लोक करू शकतात अर्ज
जन औषधी केंद्र उघडण्यासाठी केंद्र सरकारने तीन प्रकारचे प्रवर्ग तयार केले. पहिल्या श्रेणीनुसार, कोणतीही व्यक्ती, बेरोजगार फार्मासिस्ट, डॉक्टर किंवा रजिस्टर मेडिकल प्रॅक्टीशन स्टोअर सुरू करू शकतात. दुसर्‍या प्रकारात विश्वस्त, स्वयंसेवी संस्था, खाजगी रुग्णालये, सोसायटी बचतगटांना संधी मिळते आणि तिसर्‍या प्रकारात राज्य सरकारकडून नामनिर्देशित संस्था आहेत. औषध दुकान भारत पंतप्रधान औषाधी केंद्राच्या नावे उघडली जाते. जर आपण जनऔषधि केंद्र सुरू करण्यास तयार असाल तर तुम्हाला जन औषधी केंद्राच्या नावावर रिटेल ड्रग सेल्सचा परवाना घ्यावा लागेल. त्यासाठी http://janaushadhi.gov.in/online_regmission.aspx वर जाऊन तुम्हाला फॉर्म डाउनलोड करावा लागेल. पूर्वीच्या तुलनेत या योजनेतही बदल करण्यात आला आहे, आता अर्ज शुल्क म्हणून 5000 भरावे लागतील. यापूर्वी सरकारने कोणतेही अर्ज शुल्क आकारले नव्हते.

Leave a Reply