March 30, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदानासाठी अकरा प्रकारची कागदपत्रे ग्राह्य

सोलापूर;

: पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेनंतर सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार असून मतदार ओळखपत्र नसेल तर 11 कागदपत्रापैकी कोणतेही एक कागदपत्र असेल तर मतदान करता येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र हा प्रमुख दस्तऐवज पुरावा म्हणून लागतो. मतदार ओळखपत्र नसेल तर खालीलप्रमाणे एका पुराव्याच्या आधारे मतदान करता येणार आहे.

पारपत्र (पासपोर्ट), वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स, केंद्र/राज्य/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक पब्लिक सेक्टर कंपनी, पब्लिक लिमिटेड कंपनी यांच्याद्वारे जारी केलेले छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्ट कार्यालयाने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबूक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, एनपीआरच्या अंतर्गत आरजीआईद्वारे प्रस्तूत केलेले मनरेगा जॉब कार्ड, कामगार मंत्रालयाद्वारे स्वास्थ विम्याच्या उद्देशाने जारी केलेले स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रे, निवडणूक यंत्रणेद्वारे जारी केलेली अधिकृत छायाचित्र मतदान चिठ्ठी (फोटो व्होटर स्लिप), लोकसभा / विधानसभा / राज्यसभा/विधानपरिषद सदस्य यांच्याकडून देण्यात आलेले शासकीय ओळखपत्र आणि आधारकार्ड यापैकी कोणतेही ओळखपत्र असेल तर मतदारांना मतदान करता येणार असल्याचे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

Leave a Reply