December 1, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नौकरी शोधताय;तर वाचा कुठे आहे संधी

पुणे : कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नोकरीच्या संधी कमी झाल्या असताना पुण्यात मात्र नव्याने 1,000 नोकरीच्या संधी तयार होणार आहेत. ऑनलाईन कॅब बुकिंग सेवा देणाऱ्या ओला (Ola) कंपनीने पुण्या एक नवं टेक्नॉलॉजी सेंट उभारण्याचा आणि पुढील काही वर्षात तेथे जवळपास 1,000 इंजिनिअर्सला रोजगार देण्याची योजना आखली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओलाचं भारतात बंगळुरुनंतर पुण्यातील हे दुसरं टेक सेंटर असेल (Ola to set up new Tech centre in Pune will hire 1000 engineers).

Advertisement

पुण्यातील या टेक सेंटरच्या माध्यमातून ओला ग्रुपसाठी जागतिक आणि स्थानिक स्तरावरील तांत्रिक उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पुणे फॅसिलिटी पुढील 3 महिन्यात सुरु होईल आणि पुढील 3 वर्षात 1000 कुशल तंत्रज्ञांना रोजगार उपलब्ध करेल, अशी माहिती कंपनीशी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली आहे.

मागील वर्षी जूनमध्ये ओलाने इलेक्ट्रिक आणि कनेक्टेड व्हेईकलच्या कामात गती आणण्यासाठी सॅन फ्रॅन्सिस्को बेमध्ये एक अॅडव्हान्स टॅक्नॉलॉजी सेंटर सुरु केलं होतं. पुणे देखील आपल्या तांत्रित नैपुण्य आणि प्रतिभेसाठी ओळखलं जातं. तसेच आयटी हब असलेल्या पुण्यात आयटी इंफ्रास्ट्रक्चर देखील उपलब्ध आहे. त्यामुळेच पुणे ओलासारख्या तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्यांसाठी पहिल्या पसंतीचं ठिकाण आहे.

ओलामध्ये (Ola) जवळपास 4,000 कर्मचारी आहेत. यात जवळपास 1,500 कर्मचारी इंजिनिअर्स आहेत. कोरोना विषाणूच्या साथीरोगामुळे (Coronavirus Pandemic) ओलाने मध्यंतरी 1,400 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं होतं. ओलाची प्रतिस्पर्धी कंपनी उबरने (Uber) देखील 600 कर्मचाऱ्यांची कपात केली होती.

उबरही नव्या नोकरीच्या संधी देणार

ओलाची प्रतिस्पर्धी कंपनी उबरने देखील भारतात आपल्या इंजिनिअरिंग टीमला मजबूत करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी उबरने अ‍ॅमेझॉनचे दिग्गज तंत्रज्ञ मणिकंदन थंगरत्नम यांची बंगळुरुमध्ये नियुक्ती केली. त्यांच्याकडे सर्व रायडर आणि प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग टीमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, अमेरिकेतील या कंपनीने भारतात 140 इंजिनिअर्सच्या भरतीच्या घोषणे व्यतिरिक्त आणखी 85 इंजिनिअर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply