नौकरीची संधी,सुप्रिम कोर्टात..

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : सर्वोच्च न्यायालयात (supreme court) नोकरीची सुवर्ण संधी आहे. योग्य आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून यासाठी अर्ज करू शकतात. रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2020 आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरील अधिसूचना लक्षपूर्वक वाचणं आवश्यक आहे.
नोकरीसंबंधी आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया, पदांची संख्या इत्यादी माहितीसाठी येथे क्लिक करा.
Supreme Court of India Recruitment 2020 –
ब्रान्च ऑफिसर (नेटवर्क एडमिनिस्ट्रेटर) – 1 पोस्ट
ब्रान्च ऑफिसर (वेब सर्वर एडमिनिस्ट्रेटर) – 1 पोस्ट
ब्रान्च ऑफिसर (डेटाबेस एडमिनिस्ट्रेटर) – 2 जागा
ज्यूनियर कोर्ट असिस्टेंट (हार्डवेयर मेंटेनेंस) – 3 पोस्ट
ब्रान्च ऑफिसर पदांसाठी वयोमर्यादा 30 ते 45 वर्ष इतकी आहे.
तर ज्यूनियर कोर्ट असिस्टेंट पदासाठी वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांपर्यंत आहे.
Supreme Court of India Recruitment 2020: एज्युकेशन क्वालिफिकेशन
उमेदवाराकडे BE, BTech किंवा MSc कंम्प्यूटर सायन्स डिग्री असणं गरजेचं आहे.
कसा कराल अर्ज –
या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन अप्लाय करावं लागेल. यासाठी फॉर्म नोटिफिकेशन लिंकच्या PDF मध्ये दिलं आहे. उमेदवार तेथून डाऊनलोड करुन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करताना कोणतीही फी द्यावी लागणार नाही.
निवड प्रक्रिया –
उमेदवाराची निवड लेखी परीक्षा, अॅप्टिट्यूड टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे होणार आहे.
रिक्त जागांसाठीची डायरेक्ट लिंक –