नुतन पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शिंदे यांचा पांगरीत शिवछत्रपती प्रशालेत सत्कार

बार्शी;
पांगरी येथील शिवछत्रपती विद्यामंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थी व चिंचोली ता.बार्शी येथील रहिवासी प्रदिप वसंत शिंदे यानी पोलीस खात्यांतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापीका ज्योत्स्ना डोके यांच्यासह शिक्षकांच्या हस्ते त्यांचा प्रशालेच्या प्रांगणात यथोचीत सत्कार करण्यात आला.
शिंदे 2012 मध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती झाले होते.त्यानंतर 2017 मध्ये त्यानी परिक्षा दिली होती.यश मिळाल्याबद्दल शिंदे यांचे अभिनंदन होत आहे.
यावेळी शकुर ईनामदार,सुधीर चौधरी, पी.व्ही.नलवडे,विष्णु घावटे,अनिल वळसंगे,नझरोद्दीन काझी,उमेश जगदाळे, आर. एस.वाघमारे,एस. एम.हक्के,गणेश काळे,रमेश गोडसे, गणेश जाधव आदी उपस्थित होते.