October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नारी येथे समुदाय आरोग्य अधिकारी यांचा पदभार निम्मित सत्कार

बार्शी ;
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नारी येथे नुकतीच निवड झालेल्या समुदाय आरोग्य आधिकारी प्रमिला प्रदीप धावारे यांचा नारी ग्रामस्थाच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला.नुकत्याच राज्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या निवडी झालेल्या आहेत.ग्रामीण आरोग्याच्या दृष्टीने या निवडी अतिशय योग्य आहेत.ग्रामीण भागातील आरोग्याच्या सुविधा व जनजागृती साठी संबंधीत अधिकारी यांची महत्वाची भूमिका असणार आहे.
       यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस पाटील वैभव माळी यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळीं सुरज मोरे,आरोग्य सेविका राजश्री ढेंबरे,आशा वर्कर भाग्यश्री क्षीरसागर,बालिका सुरवसे,प्रमिला शिंदे उपस्थित होते.गावातील आरोग्य विषयी जनजागृती करून चांगल्या प्रकारे काम करण्याची ग्वाही यावेळी धावारे  यांनी दिली.

Advertisement

Leave a Reply