October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नारी येथे शांतता समितीची मीटिंग संपन्न

सोलापूर महाराष्ट्र स्पीड न्युज

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने नारी ता.बार्शी येथे पांगरी पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सहायक पोलिस निरीक्षक सुधीर  तोरडमल यांनी बैठकीत ला संबोधित करत त्यांनी लोकशाही पद्धतीने व शांततेत निवडणूक पार पडण्याचे आवाहन केले.तरुण वर्गांनी सोशल मीडिया चा वापर योग्य रीतीने करावा.सोशल मीडिया मधून दोन गटात कांही अनुचित प्रकार घडू नये या साठी तरुण वर्गाला मार्गदर्शन केले.शांतता पूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या.या बैठकीला स्थानिक दोन्ही पॅनल चे प्रमुख तसेच सर्व उमेदवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन पोलीस पाटील वैभव माळी-पाटील यांनी केले.गावातील निवडणूक कार्यक्रम शांततेत पार पडण्याचे आश्वासन यावेळी ग्रामस्थांनी दिले.

Leave a Reply