February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नारीत रक्तदान शिबिरात 51 रक्तदात्यांचा सहभाग

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

नारी ता.बार्शी येथील सत्संग भवन यांच्या वतीने  सालाबादप्रमाणे या ही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कोरोना सारख्या महामारीच्या काळात कोणालाही रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून सत्संग भवन नारी यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.नारी येथील या सत्संग भवनाच सर्व सामाजिक कार्यात सहभाग असतो.या शिबिराचे उद्धघाटन गावचे पोलीस पाटील वैभव माळी, संतोष पाटील ,हनुमंत जगदाळे,बालाजी कदम,बार्शी शाखा प्रमुख विठ्ठल बचुटे, नारी शाखा प्रमुख दिलीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी 51 रक्तदात्याने रक्तदानात सहभाग घेतला.या शिबिराचे आयोजनात यशस्वी करण्यासाठी सेवादल अधिकारी  किशोर ढोले,सेवादल शिक्षक शेळके,हनुमंत शिंदे,विठ्ठल दळवी,जगन्नाथ शिंदे,बापू कदम,सुरज दळवी,संदीप कदम,वैभव कदम तसेच सर्व सेवेकरी यांनी परिश्रम केले.

Leave a Reply