नारीत दोन गटात मारहाण, परस्परविरोधी फिर्यादीवरूण 30 जनावर गुन्हा दाखल

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
मतदान केंद्रात व परिसरात थांबण्याच्या कारणावरून दोन गटात मारहाण होऊन दोन्ही गटातील 30 जनावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकार नारी ता.बार्शी येथे घडला.
#अनिल कांबळे वय 40, रा नारी, यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की पत्नी सुवर्णा ही नारी गाव कामगार कोतवाल आहे. दि.15 जानेवारीस नारी ग्रामपंचायत निवडणुक असल्याने गावात जि.प.शाळेत निवडणुक प्रक्रिया चालु होती.निवडणुकीस कर्मचारी आले होते.त्यांची पत्नी सुवर्णा ही नारी गावची कोतवाल असल्याने आलेल्या कर्मचा-यांना जेवणाची व इतर व्यवस्था ते पाहत होते.
तसेच त्यांचा भाऊ सुनिल कांबळे हा मतदान प्रतिनिधी म्हणुन होता.ते सायंकाळी 05.00 वा चे सुमारास जि.प.शाळेच्या गेटच्या आतील बाजुस थांबले असतांना गावातील रामचंद्र माळी हे त्यांना म्हणाले कि, तु दिवसभर शाळेमध्ये का थांबतोस तु बाहेर जा. असे म्हणाल्याने दोघामध्ये किरकोळ बाचाबाची झाली.त्यावेळेस ते शाळेमधुन बाहेर आले असता गावातील अनिल बारंगुळे ,सुनिल बारंगुळे ,अमोल रानमाळ ,अमीत कदम,आण्णा शिंदे, सुरज मोरे , आण्णासाहेब साठे, दयानंद शिंदे ,बालाजी शिंदे,पांडुरंग बदाले,सुजित बदाले.दादासाहेब कुरूंद,रामहरी शिंदे ,आतुल बदाले ,बलबिम बिरंजे, दिलीप शिंदे,रोहित साकतकर, महादेव कोंढारे,लखन शिंदे, केशव कदम सर्व रा नारी हे फिर्यादी जवळ पळत आले. त्यापैकी आमीत कदम याने त्यांना लाथ घातली.ते खाली पडल्यावर इतर लोकांनी ही लाथा बुक्क्यानी मारहाण करण्यास सुरवात केली.त्यावेळी भाऊ सुनिल कांबळे, संतोश कांबळे, प्रसाद बदाले, मंगेष पाटील, विशाल धर्मराज कदम, बाळासाहेब धर्मराज कदम,सुरेश पाटील, व इतर लोक सोडवीण्यास आले असता वरील लोकांनी त्यांनाही लाथाने व हाताने मारहाण करण्यास सुरवात केली. त्याचवेळी मंगेश पाटील, विशाल कदम यांना दगडाने व सोडवीण्यास आलेल्या इतर लोकास लाथाबुक्क्यानी मारहाण करून शिवीगाळ करून जखमी केले.
#विरोधी आण्णासाहेब साठे वय 32, रा नारी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की गावच्या ग्रामपंचातीची सार्वत्रीक निवडणुक असल्याचे निवडणुकीची प्रक्रिया जि.प.मराठी शाळा नारी येथे पार पडत होती. ते मतदान करण्यासाठी दुपारी 04.00 वा चे सुमारास जि. प. शाळा नारी येथे मतदान करून शाळेचे बाहेर थांबले असता 5.00 वा चे सुमारास गावचे रामचंद्र माळी व आनिल लक्ष्मण कांबळे हे एकमेकांना शिवगाळी करीत जि.प.शाळेमधुन बाहेर आले.त्यावेळी अनिल कांबळे ,सुनिल कांबळे ,संतोश कांबळे,प्रशांत बदाले,मंगेश पाटील,विशाल कदम,बाबासाहेब कदम,सुधीर बदाले,महादेव कांबळे व गोकुळ कांबळे हे त्यांच्या जवळ आले व तु इथे का थांबला असे म्हणुन मारहाण करण्यास सुरवात केली.त्यावेळी अमोल रानमाळ, आण्णा शिंदे, अनिल बारंगुळे, सुनिल बारंगुळे,व इतर लोक सोडवीण्यासाठी आले असता वरील लोकांनी त्यांना व इतर लोकांना हाताने व लाथा बुक्क्याने शिवीगाळी करून मारहाण केली व अमोल रानमाळ, आण्णा शिंदे यांना डोकीत दगडाने मारहाण करून जखमी केले.
परस्परविरोधी फिर्यादीवरूण दोन्ही गटातील तिस जनावर पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.