October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नारीच्या सरपंचपदी सौ. स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंच पदी नामदेव वाघ बिनविरोध


बार्शी ;
नारी ता.बार्शी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ.राजेंद्र राऊत गटाच्या सौ.स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंच पदी नामदेव वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
    नारी येथील लढत अतिशय अटीतटीत पार पडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी ८ सदस्य निवडून येऊन आ.राऊत गटाने बाजी मारली होती.या निवडणुकीत राऊत गटातून तरुण उमेदवारांना मोठ्या प्रमाणात संधी दिली गेली होती.काल झालेल्या सरपंच निवडणुकीत सौ.स्वाती अमोल रानमाळ तर उपसरपंच पदी नामदेव वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी तंटामुक्त समिती च्या अध्यक्ष पदाची देखील निवड करण्यात आली.तंटामुक्ती अध्यक्ष पदी संजय दाभाडे यांची निवड करण्यात आली.
यावेळी केशव घोगरे,संतोष पाटील,दादा कदम,रामचंद्र माळी, अनिल रानमाळ,वैजीनाथ शिंदे,काकासाहेब पाटील,राकेश पाटील,बिभीषण कदम,विश्वास शिंदे.पोलीस पाटील वैभव माळी  आदी उपस्थित होते.

Advertisement

या निवडी वेळी सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.

#निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून  जे.आर.धनुरे यांनी काम पाहिले.

Leave a Reply