October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी बकरीऐवजी कर्मचा-यालाच पिंज-यात बसवले;वनखात्याचा प्रताप

चंद्रपूर : नरभक्षक वाघ वा बिबट्याला बेशुद्ध करून पकडले जाते वा पिंजऱ्यात बकरीचे आमिष दाखवून जेरबंद केले जाते. राजुरा तालुक्यात दहा जणांचे बळी घेणारा आर टी -१ वाघ या प्रयोगाला जुमानत नसल्याने बकरीऐवजी वनविभागाने चक्क आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांनाच पिंजºयात बसविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंजºयात कोण कितीवेळ बसणार याचे वेळापत्रक वनविभागाने तयार केले आहे.

सायंकाळी ६ ते सकाळी ८ असे तब्बल १४ तास त्यांना पिंजºयात बसविले जात आहे. राजुरा वनक्षेत्रात ११ आॅक्टोबरपासून हा प्रयोग राबविला जात आहे. तो १८ आॅक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे.

हा प्रयोग सहा दिवसांपासून राबविला जात आहे. तरीही वाघ पिंजºयात बसलेल्या वनपाल, वनरक्षक वा वनमजुराजवळ फिरकला नसल्याचे समजते. राजुरा वनक्षेत्रासह परिसरातील वनक्षेत्रात आरटी-१ वाघाने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या वाघाने दहा जणांचा बळी घेतला आहे. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला जेरबंद करा वा ठार मारा असा शेतकºयांसह राजकीय दबाव वनविभागावर वाढला आहे. वाघ पिंजºयात अडकत नाही. शिवाय तो शॉर्प शूटरच्या निशाण्यावरही येत नसल्याने वनविभाग हतबल झाला आहे. अखेर वनविभागाला बकरीऐवजी वनपाल, वनरक्षक व वनमजुराला पिंजºयात बसवावे लागत आहे.

हा प्रयोग तसा जुनाच – एन. आर. प्रवीण
बिबट विहिरीत पडला वा वाघ जखमी अवस्थेत आहे. अशावेळी त्याला बेशुद्ध करण्यासाठी मनुष्याला पिंजऱ्यात बसवून जवळ नेले जाते. त्यानंतर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करणे सहज शक्य होते. चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी वनविभागात एका जखमी वाघाची जवळून माहिती घेण्यासाठी हा प्रयोग केला होता, अशी माहिती मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी ‘लोकमत’ला दिली.

Leave a Reply

disawar satta king