December 3, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

धानोरेच्या सरपंच पदी ज्योत्स्ना जमदाडे तर उपसरपंच पदी राणी चव्हाण

बार्शी ;
बार्शी तालुक्यातील धानोरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. राजेंद्र राऊत गटाच्या ज्योत्सना आनंद जमदाडे तर उपसरपंचपदी राणी तानाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी डी.एन. मिसाळ व सचिव यु. डी.गिते यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
  यावेळी बार्शी पंचायत समिती सदस्य सौ. माधुरी गोरे ,माजी सरपंच सुमंत गोरे, संतोष पाटील ,भगवान गोरे, रामचंद्र गोरे, शिवा जमदाडे, बसवेश्वर जमदाडे, नवनाथ चव्हाण, परमेश्वर चव्हाण, संतनाथ शिंदे, नवनाथ गोरे, आनंद जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
  फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Leave a Reply