October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

धनादेश प्रकरणी द्राक्ष व्यापार्‍यास शिक्षा, माढा न्यायालयाचा निकाल

माढा;- महाराष्ट्र स्पीड न्युज

मालवंडी ता.बार्शी येथील द्राक्ष उत्पादक शेतक-यास खात्यात पुरेसी रक्कम नसताना धनादेश देऊन फसवणुक केल्याप्रकरणी व्यापा-यास सहा महिने कारावास व चेक रकमेच्या दुप्पट रक्कम देण्याचे आदेश माढा न्यायालयाने दिले .
# याबाबत अधिक माहीती अशी की वामन जालिंदर काटे यांनी 2015 साली त्यांच्या शेतातील दहा टन द्राक्ष केज येथील द्राक्ष व्यापारी गफार सत्तर बागवान यांना विक्री केली होती सदर व्यवहारापोटी द्राक्ष व्यापारी गफार बागवान यांनी वामन काटे यांना रक्कम रुपये 200000 करिता दिनांक 25 /6 /2015 रोजी वैद्यनाथ को-ऑपरेटिव्ह बँक लि शाखा केज या बँकेचा धनादेश दिला तसेच उर्वरित रक्कम रुपये एक लाख 25 हजार करिता दिनांक 25 /7/ 2015 रोजी दुसरा धनादेश दिला सदरचे दोन्ही धनादेश फिर्यादी वामन काटे यांनी त्यांचे खाते असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखा माढा येथे वाटण्या करिता जमा केले असता सदरचे दोन्ही धनादेश द्राक्षे व्यापारी गफार बागवान यांच्या खात्यावर धनादेश वाटला जाईल एवढी रक्कम शिल्लक नसल्यामुळे अनादरीत झाले त्यामुळे फिर्यादी वामन काटे यांनी गफार बागवान यांच्याविरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 प्रमाणे माढा येथील फौजदारी न्यायालयामध्ये फिर्याद दाखल केली सदर प्रकरणी चौकशी होऊन मेहेरबान न्यायालयाचे न्यायाधीश माननीय श्री काझी साहेब यांनी आरोपी गफार बागवान यास दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोषी धरून आरोपीस रक्कम रुपये दोन लाख च्या धनादेश प्रकरणी सहा महिने कारावास व फिर्यादीस चेक रकमेच्या दुप्पट म्हणजेच रक्कम रुपये चार लाख नुकसान भरपाई म्हणून देणेबाबत आदेश पारित केला तसेच रक्कम रुपये एक लाख पंचवीस हजार चे धनादेश प्रकरणी चार महिने कारावास व 2 लाख 50 हजार रुपये नुकसान भरपाई पोटी फिर्यादीस देणेबाबत आदेश केले.            सदर प्रकरणी यातील फिर्यादी तर्फे ॲडव्होकेट सोमनाथ सावंत बार्शी व ॲडव्होकेट महेश जाधव यांनी काम पाहिले

Advertisement

Leave a Reply