June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दुचाकी अपघातात वृद्धाचा मृत्यू

बार्शी महाराष्ट्र स्पीड न्युज

किराणा बाजार खरेदी करून गावाकडे परत जाताना   रस्त्यावर उभे असलेले वाहन चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार बार्शी-भुम मार्गावर आगळगाव शिवारात घडला.

Advertisement

#दगडु येदा जाधवर वय 60 रा.बोरगाव (कांदे) ता.बार्शी असे दुचाकी अपघातात जखमी होऊन मृत्यू मुखी पडलेल्याचे नाव आहे.

#निर्मला दगडु जाधवर वय 55 वर्षे  रा, बोरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्या पती दगडु जाधवर, मुलगा शंकेश्वर जाधवर,सुन रेशमा असे एकत्र राहणेस आहेत.
सायंकाळी 06.00 वा.चे सुमारास त्या व पती दगडु येदा जाधवर मोटारसायकल
क्र.MH 13 BC 5982 वरून आगळगाव येथे बाजार आणण्या करिता गेले होते. बाजार सामन घेवून परत रात्री
07.30 या.चे सुमारास मो.सा वरून बोरगावकडे चाललो असता,  मोटारसायकल बार्शी आगळगाव रोडवर
राजगड हॉटेलच्या पुढे बोरगावच्या दिशेने थोड्या अंतरावर आली असता. समोर रस्तामध्ये एक अज्ञात वाहन ऊभे
असल्याचे दिसल्याने  पती दगडु जाधवर यांनी ते चालवीत असलेली मो.सा.क्र.MH 13 BC 5982 ही पुढे ऊभे
असलेले वाहनास धडकू नये म्हणुन उजव्या बाजुस घेण्याचा प्रत्यन केला असता पतीच्या ताब्यातील
मोटारसायकल स्लिप होवून आम्ही खाली पडल्याने माझ्या पतीचे डोक्याची पाठीमागील बाजु रोडवर आदळल्याने ते
जबर जखमी झाले त्यांच्या पोटास,पायस खरचटेल आहे. तसेच मला ही गाडीवरून पडल्यास डोकेस जखम झाली
आहे व अंगाला मुक्का मार लागला आहे. त्यानंतर सदर ठिकाणी आमचे ओळखीचे सुभाष  बीडवे हे बोरगावकडे
जात होते. आम्ही त्यांना दिसल्याने ते थाबले व लागलीच तेथे तेथिल हॉटेलवरचे इतर दोन इसम आले व त्यांनी
मुलास फोन करून बोलावले तसेच ऑबुल्सन गाडी बोलावली व आम्हास जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल
केले असता तेथे आम्हास ते औषध उपचारा पुर्वीच मयत झाले असे सांगितले
याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र मंगरूळे हे करत आहेत

Leave a Reply