October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दुचाकीच्या धडकेत नारीतील वृद्धाचा मृत्यु


बार्शी ;
भरधाव वेगातील दुचाकीस्वाराने वृद्धास जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात वृद्धाचा दुर्दैवी मृत्यु झाल्याचा प्रकार कुर्डूवाडी-बार्शी  रस्त्यावर घडला.

#अभिमान गणपती कोलते वय.60 रा.नारी ता.बार्शी असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे.

#सतीश अभिमान कोलते वय 38 वर्षे रा.नारी ता.बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ते व वडिल मोटार सायकल वरुन ब्रम्हगाव ता. परंडा येथुन नारी येथे कुर्डूवाडी-बार्शी रोडने जात होते.दरम्यान ते खांडवी ता.बार्शी गाव ओलांडून  लाॅन्स येथे आले असता वडीलास लघुशंका करावयाची असल्याने त्यांनी त्यांची मोटार सायकल बाजुला उभी केली.त्यांचे वडील मोटार सायकल वरुन उतरुन रोड पास करुन पलीकडे जात असताना कुर्डूवाडी कडुन बार्शीकडे जात असलेल्या मोटार सायकलस्वाराची  वडीलास धडक लागली. वडिल रोडवर पडले तसेच मोटार सायकलस्वार हा पण मोटार सायकलसह खाली पडला त्यात  वडिलास डोकीस, नाकास हाता,पायास गंभिर दुखापत झाली तसेच मोटार सायकल स्वार यास पण हाता,पायास मार लागुन दुखापत झाली.दुचाकीस्वारास त्याचे नाव विचारले असता अमोल अंबादास गायकवाड रा. लासुर्णे, ता.इंदापुर, जि.पुणे असे असल्याचे सांगितले.गायकवाड याच्यावर अविचाराने,हायगईने रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात गाडी चालवुन कोलते यांना मोटार सायकलची जोराची धडक देवुन गंभीर जखमी करुन त्यांचे मरणास कारणीभुत होवुन मोटार सायकलचे अंदाजे 10,000 रु. चे नुकसान करुन स्व:ता पण जखमी झाल्याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply