दुचाकीचोरीचा छडा लावण्यात बार्शीत पोलिसांना यश

बार्शी
रात्री चोरीला गेलेल्या पन्नास हजार रूपये किंमतीच्या दुचाकीचा कांही तासात छडा लावण्यात बार्शी पोलिसांना यश आले.दुचाकी चोरी प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका कामगारास अटक करण्यात आली आहे.
#अंकितकुमार विश्वकर्मा वय 24 रा. वर्सोवा ता.मालवा जि.फत्तेपुर असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोराचे नाव आहे
# अशोक मधुकर माळवे वय 29 वर्ष, राऊत चाळ बार्शी यांनी दुचाकी चोरीबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. ते मेडीकल एजन्सीमध्ये काम करतात.मोटारसायकल नं. MH 13 DL 0841 ही 08/00 वा. चे सुमारास त्यांचा लहान भाऊ बालाजी माळवे व त्याचा मित्र संतोष काळे हे घेवुन गेले होते. त्यांनी मोटारसायकल ऐनापुर मारुती रोड अश्विनी वाईन शॉपचे समोर 08/15 वा. लावली होती. व ते दोघेजन बाजुलाच असलेल्या खारमुरेच्या गाड्यावरील मित्र सुदर्शन शिराळ याचे सोबत बोलत थांबले होते. त्यानंतर 08/30 वा. ते गाडीकडे गेले असता त्यांना मोटारसायकल दिसुन आली नव्हती.
पोनी संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी धन्नाप्पा शेटे यांनी चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले.