June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दिव्यांग शाळा कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करा,विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या कडे मागणी

बार्शी;-महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

दिव्यांग शाळा,कर्मशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अयोग लागू करावा अशी मागणी कर्मचा-यांनी एका लेखी निवेदनाद्वारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या कडे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की समाज कल्याण विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग शाळेमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अद्याप दि. ०१/०१/२०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला नाही.राज्यात एकूण २००० मतिमंद, मुकबधिर, अंध व अस्थिव्यंग प्रवर्गाच्या दिव्यांग शाळा कार्यरत आहेत. या शाळेत एकूण २५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील अद्याप सदर कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळालेला नाही. मुंबई मंत्रालय मधील सामाजीक न्याय व अर्थ विभागाकडून वेळोवळी अनेक त्रुटी काढण्यात आल्या आहेत. व सध्याचे शासन सातवा आयोग देण्यास टाळाटाळ करीत आहेत.  राजीव स्मृती बहुउद्देशीय संस्था बार्शी या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले. यावर विरोधीपक्ष नेते म्हणाले याबाबत लवकरात लवकर पाठपुरवा करुन दिव्यांग शाळेतील शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग करण्यातबाबत पाठपुरावा करण्यात येईल. निवदेन देताना मोहण लोहार,आप्पासाहेब बसाटे, लतीब शेख,गणेश जगताप, अमोल बोंगाळे, संजय सावंत, शरद ताकभाते,नितुन शिंदे, मिलींद जाधव, इस्माईल शेख, धनंजय जगदाळे, सादीक पठाण उपस्थित होते.

Leave a Reply