October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दिव्यांग बालकांना समाज प्रवाहात आणणारी आगळगावची मतिमंद निवासी शाळा

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज

दिव्यांग मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यात महत्त्वाचे योगदान आगळगाव ता.बार्शी येथील निवासी मतिमंद शाळा देत आहे.
मतिमंद दिव्यांग मुलांना मुख्य विकास प्रवाहत आणण्यासाठी आगळगाव येथील भारतमाता बहुउद्देशीय संस्था, बार्शी संचलित मतिमंद निवासी शाळा,
आगळगाव आधारवड ठरली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी क्रिडा, चित्रकला, हस्तकला, प्रकारात नैपुष्य प्राप्त केले आहे. शाळेत ५० मतिमंद विद्यार्थी
आत्मनिर्भरदतेचे धडे गिरवत आहेत.
भारतमाता बहुउद्देशीय संस्था, बार्शीचे सचिव श्री शरद उकिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतिमंद निवासी शाळेचे मुख्याध्यापक सुधीर जगताप, अधिक्षक
भिमराव दळवी व सहकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे शाळेने उपक्रमशील शाळा, म्हणून
राज्यात नावलौकिक मिळवला आहे. २०१९ मध्ये अंपग कल्याण आयुक्तालयाने
शाळेची तपासणी करुन शाळेला अ दर्जा दिला एस.बी. आय. बँक शाखा बार्शी
यांनी दिव्यांग मुलांना संगणक भेट दिले. त्यामुळे दिव्यांग मतिमंद मुलांना संगणक
शिक्षण देणारी ही जिल्हयातील पहिलीच शाळा ठरली. या शाळेत सध्या ५० मुले
निवासी शिक्षण घेत आहेत. या शाळेत प्रशिक्षित शिक्षण वर्ग कार्यरत आहेत.शाळेतून शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडलेली मुले रोजगार निर्मिती करत आहेत.काहीजण शेती व पशुपालन करत आहेत.दिव्यांग मुलांना कौशल्यावर आधारित उद्योग निर्मितीसाठी कायमस्वरुपी प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचा संस्थेचा मानस आहे असे संस्थेचे सचिव शरद उकिरडे यांनी सांगितले.

Leave a Reply