दिल्लीच्या आंदोलनावर तोडगा काढा:-इस्माईल पठाण,शेतकरी आंदोलनाला भारतीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा.

सोलापूर;-महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कमजोर समजू नये. महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये. दिल्लीतील आंदोलनावर सरकारने तोडगा काढावा.
हे आंदोलन फक्त शेतकऱ्यांपुरते मर्यादित नसून ही देश वाचविण्याची लढाई आहे. यासाठी साहित्यिक,विचारवंत, बुद्धिजीवी, तरुण व समाजातील सर्व क्षेत्रातील संवेदनशील मनाच्या व सामाजिक भान जिवंत असणाऱ्या प्रत्येक माणसाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शेतकऱ्यांची ही लढाई केंद्र सरकार पुरती नसून, खरी लढाई अंबानी-अदाणी-मोदी विरुद्ध शेतकरी अशी आहे.असे भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इस्माईल पठाण यांनी सांगितले.