October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दहा दिवसात पिकविमा देण्याचे लेखी आश्वासन,शेतकरी संघटनेचे आंदोलन मागे, आंदोलनाच्या धसक्याने विमा कंपनीने ठेवले होते कार्यालयच बंद, शेतकऱ्यांनी केली बंद दारासमोर बोंबाबोंब

सोलापूर ;महाराष्ट्र स्पीड न्युज
    शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड हे मागील अनेक  वर्षापासून जिल्ह्यासाठी असणाऱ्या त्या त्या पिकविमा कार्यालयात आंदोलन करून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खातेवर पैसे सुटत नाहीत तोपर्यंत कार्यालयच बंद करू देत नसल्यामुळे आंदोलनाच्या धसक्याने भारती अक्सा विमा कंपनीने कार्यालयच बंद ठेवल्याने गायकवाड यांचे नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बंद कार्यालयाबाहेर बसून बोंबाबोंब आंदोलन केले त्यानंतर गायकवाड यांनी शेतकऱ्यांना घेऊन लागलीच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे कार्यालयात ठिय्या मांडताच अधिक्षक कृषी अधिकारी माने यांनी पिकविमा कंपनीच्या प्रमुखाला त्याठिकाणी बोलावून घेतले त्यावेळी लागलीच जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेल्या २०० शेतकऱ्यांना पाच दिवसाच्या आत तर जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांचाही दहा दिवसात पिकविमा जमा करणार असाल्याचे लेखी आश्वासन विमा कंपनीचे प्रमुख बी. नागेश यांनी दिल्यानंतरच रात्री ८ वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ सारवडे, सुनिल बिराजदार, गौरव गर्जे, अभिजीत पाटील, मुकूंद पाटील, मनोज पाटील, अमोल काकडे, नानासाहेब डुरे, नाना सातपुते, पिंटू चकरे, राम जगदाळे,  हनुमंत डुरे, पिंटू शिंदे, महादेव शिंदे, नितीन गव्हाणे, राहुल यादव, सागर यादव, बालाजी यादव, कल्याण जांभळे, सौरभ कुलकर्णी, तुषार यादव आदींसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. 

Leave a Reply