February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दडसिंगे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वाचले वनक्षेत्र,तरीही दहा हेक्‍टरवरील क्षेत्र जळुन खाक.वन अधिका-यांकडुण वेळकाढू पणा

बार्शी ;महाराष्ट्र स्पीड न्युज
दडशिंगे ता.बार्शी येथील ग्रामस्थांच्या सतर्कते मुळे बळेवाडी- सौन्दरे मधील आरक्षित वनक्षेत्रास लागलेली आग आटोक्यात  आणण्यात आली.वनक्षेत्रास  लागलेली आग दडशिंगे ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे  आटोक्यात आणून पुढील अनर्थ टळला असला तरी अधिकारी घटनास्थळी वेळेत न आल्यामुळे तब्बल दहा हेक्‍टरवरील वनक्षेत्र जळुन खाक झाले.हा प्रकार आज रविवारी सकाळी  10 च्या सुमारास घडला.

Advertisement

  बार्शी तालुक्यात सतत घडत असलेल्या वनक्षेत्र आगीच्या प्रकारामुळे  वन्य जिव व पक्षी यांचे जीवनास  धोका निर्माण झाला आहे.  आग लागली सदर घटनेची माहिती वन विभागास शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग घोलप यांनी कळवली सदर वनात मद्येपी जुगारी यांचा याठिकाणी मोठया प्रमाणात वावर असल्याचे आढळून आले आहे यापूर्वी हि अश्याच प्रकारे दोन तीन वेळा या वनास आग लागली होती त्यावेळी हि दडशिंगे येथील ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली होती वन विभागाच्या हलगर्जी पणामुळे या वनास आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत आग आटोक्यात आणण्यासाठी दडशिंगे गावचे सरपंच सचिन गोसावी, शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग घोलप, पोलीस पाटील बळवंत पाटील, चत्रभुज काळे, सुधाकर मोरे, खंडू भिसे, परमेश्वर मोरे, नागेश मोरे, हनुमंत सुरवसे यांच्या सह बरेच ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
  घटनेची तात्काळ माहिती देऊन हि वनरक्षक व्हि ए कुंभार आग आटोक्यात आल्या नंतर उशिरा ने पोहोचल्या. बाकीच्या अधिका-यांनी घटनास्थळी  येण्याचं टाळलं असेही पांडुरंग घोलप यांनी सांगितले.

Leave a Reply