June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

दडसिंगे येथे शारिणी फाउंडेशन,नारी यांच्या वतीने मास्कचे वाटप

बार्शी;

दडशिंगे ता बार्शी येथील जि प. शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांना शारिणी फाउंडेशन नारी यांच्या वतीने शिवरत्न प्रतिष्ठान दडशिंगे  यांचे माध्यमातून शिवजयंतीचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना आणि शिवरत्न प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना  N95 चे दोनशे मास्क वाटप करण्यात आले. कोरोना विषयक जनजागृती व सोशल डिस्टंसिंग चे महत्त्व समजावून सांगितले. पर्यावरणीय बदल व निर्माण होणाऱ्या रोगराई याबद्दल असणारा अंतर संबंध याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षण, वृक्षलागवड, स्वच्छता इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.
   यावेळी संस्थेचे किशोर लेंगरे  ,राकेश पाटील  ,आम्रपाली पाटील, इब्राहिम काझी ,दडशिंगे गावचे शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग घोलप,कलिमा काझी , मंगेश शिंदे,शिवरत्न प्रतिष्ठान चे अध्यक्ष धनाजी घोलप, उपाध्यक्ष रणजित मोरे शालेय व्यवस्थापन चे चंद्रकांत काळे प्रतिष्ठान चे सदस्य गणेश कदम पांडुरंग काळे दत्तात्रय घोलप सौदागर कदम बाळासाहेब सोनवणे सौरभ तांबीले सुजित घोलप चत्रभुज काळे  सागर गायकवाड इ. उपस्थित होते.  सूत्रसंचालन शिवसेना शाखाप्रमुख पांडुरंग घोलप यांनी केलं आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बरबडे  यांनी केलं

Advertisement

Leave a Reply